• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटतर्फे (Economist Intelligence Unit - EIU) राहणीमान किंमतीच्या खर्चावर आधारित २०२० मधील जगातील सर्वात महागड्या शहरांबाबतचा आपला द्वैवार्षिक ‘जगभरातील राहणीमान किंमत खर्च (Worldwide Cost of Living - WCOL)’ निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • १३३ शहरांचा समावेश असणाऱ्या या यादीत हॉंगकॉंग (चीन), पॅरिस (फ्रान्स) आणि झुरिच (स्वित्झर्लंड) ही सर्वात महागडी शहरे म्हणून समाविष्ट झाली आहेत.

  • दमास्कस (सिरिया), टास्केंट (उझबेकिस्तान) आणि लुसाका (झांबिया) या यादीमध्ये सर्वात स्वस्त शहरे म्हणून शेवटच्या ३ स्थानांवर विराजमान झाली आहेत.

EIU बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: EIU म्हणजेच Economist Intelligence Unit अर्थात इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: लंडन, युनायटेड किंगडम हे EIU च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९४६ साली EIU ची स्थापना करण्यात आली होती.