• US हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Air Quality Index - AQI) जाहीर करण्यात आलेल्या वायू प्रदूषण आकडेवारीनुसार पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी लाहोरला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून अव्वल स्थान देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर यादीत लाहोरने ४२३ PM (Particulate Matter - PM) गुणांची नोंद केली आहे.

  • नवी दिल्ली २२९ PM सह दुसर्‍या तर नेपाळची राजधानी काठमांडू १७८ PM सह तिसर्‍या स्थानावर विराजमान आहे.

  • हवा श्वास घेण्यास सुरक्षित आहे की नाही याची लोकांना कल्पना देण्यासाठी US पर्यावरण संरक्षण एजन्सीमार्फत (Environmental Protection Agency - EPA) हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) जारी करण्यात आला आहे.

  • AQI च्या आधारे हवेची गुणवत्ता ० ते ५०० या स्केलवर ठेवून मोजली जाते. AQI ५० पेक्षा कमी असेल तर हवेची गुणवत्ता समाधानकारक मानली जाते.