-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग खिंडीत स्थित जगातील सर्वाधिक लांब आणि उंच अशा अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला देण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
लेह-मनाली महामार्गावरील पीर पंजाल श्रेणीमधील रोहतांग खिंडीत हा बोगदा तयार करण्यात येत आहे.
-
समुद्र सपाटीपासून याची उंची ३१०० मीटर इतकी आहे.
-
सदर बोगद्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे.
अटल बोगद्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
बोगद्याच्या निर्मितीबाबतचा प्रस्ताव हा १८६० सालचा आहे. सर्वात पहिल्यांदा मोराव्हियन मिशनमार्फत (Moravian Mission) हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
-
त्यानंतर १३९ वर्षानी तत्कालीन पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनी पुन्हा हा प्रस्ताव आणला.
-
सुरवातीला त्यास रोहतांग बोगदा असे नाव देण्यात आले. मात्र नंतर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी त्याचे नाव 'अटल बोगदा ' असे ठेवले.
-
मनाली ते लेह दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे ४६ किलोमीटर कमी होईल.
रोहतांग खिंडीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
ही खिंड कुलू दरी खोरे आणि हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पिती या खिंडींना जोडण्याचे कार्य करते.
-
चिनाब व बियास नद्यांच्या मधल्या पाणलोट क्षेत्रावर हा मार्ग आहे.