-
जगातील सर्वात मोठा सौर वृक्ष CSIR-CMERI द्वारे विकसित करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील CSIR-CMERI च्या निवासी कॉलनीमध्ये हा सौर वृक्ष बसविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
या सौर वृक्षाची स्वच्छ आणि हरित शक्ती निर्माण करण्याची वार्षिक क्षमता १२०००-१४००० युनिट इतकी आहे तर त्याची स्थापित क्षमता ११.५ किलोवॅटपेक्षा जास्त आहे.
-
सौर वृक्षाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की प्रत्येक सौर पॅनेलचा सूर्यप्रकाशापर्यंत जास्तीत जास्त संपर्क साधू शकेल.
-
एका सौरवृक्षामध्ये साधारणतः ३५ सौर पीव्ही पॅनल्स असतात ज्यात प्रत्येकाची क्षमता ३३० डब्ल्यूपी इतकी असते.
-
वृक्षाच्या ऊर्जा निर्मितीच्या आकडेवारीवर दैनंदिन आधारावर परीक्षण केले जाऊ शकते.