-
युरोपियन अंतराळ एजन्सी (European Space Agency - ESA) २०२१ च्या अखेरीस पृथ्वीच्या कक्षेत WISA वुडसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
ठळक मुद्दे
-
अंतराळ यानामधील संरचनेत प्लायवुड सारख्या लाकडी साहित्याची उपयोगिता चाचणी घेण्यासाठी सदर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
-
सदर प्रक्षेपण हे लाकडी सामग्री उष्मा, शीत, निर्वात पोकळी आणि रेडिएशन यासारख्या अत्यंत अवकाश परिस्थितीत कार्यरत राहील.
-
न्यूझीलंडमधील माहिया प्रायद्वीप लाँच कॉम्प्लेक्सपासून हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
-
सदर उपग्रहाची रचना आणि अंगभूत प्रक्रिया फिनलँड येथे पार पाडण्यात येणार आहे.