-
जागतिक बँकेमार्फत (World Bank) 'मानवी भांडवल निर्देशांक २०२० अपडेटः ह्युमन कॅपिटल इन द टाईम ऑफ कोविड-१९ (The Human Capital Index 2020 Update: Human Capital in the Time of COVID -19)' या शीर्षकासह अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index - HCI) २०२० हा जागतिक बँकेच्या मानवी विकास सराव समूह (Human Development Practice Group) आणि विकास अर्थशास्त्र गट (Development Economics Group) यांच्यातील सहकार्य दुवा म्हणून कार्यरत आहे.
-
मानवी भांडवल निर्देशांक २०२० मध्ये भारत १७४ देशांमध्ये ११६ व्या स्थानावर आहे.
मानवी भांडवल निर्देशांक २०२० क्रमवारीतील अव्वल देश
-
१. सिंगापूर (०.८८ गुण)
-
२. हाँगकाँग आणि चीन (०.८१ गुण)
-
३. जपान (०.८० गुण)
-
११६. भारत (०.४९ गुण)
जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.
-
अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.