• नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठीच्या २०२१ सालच्या 'शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची (Shanti Swarup Bhatnagar Awards)' घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (Council for Scientific and Industrial Research - CSIR) ८० व्या स्थापना दिनानिमित्त सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

  • CSIR मार्फत दरवर्षी हा पुरस्कार ४५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, औषध, अभियांत्रिकी आणि पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान यामधील योगदानासाठी प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्कार स्वरूपात ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देखील आहे.

पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांची यादी

जैविक विज्ञान (Biological Sciences) श्रेणी

  • डॉ. अमित सिंग

  • डॉ. अरुणकुमार शुक्ला

रासायनिक विज्ञान (Chemical sciences) श्रेणी

  • डॉ. कनिष्क बिस्वास

  • डॉ. टी गोविंदराजू

अभियांत्रिकी विज्ञान (Engineering sciences) श्रेणी

  • देबदीप मुखोपाध्याय

पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान (Earth, Atmosphere, Ocean and Planetary Sciences) श्रेणी

  • डॉ. बिनॉय कुमार सैकिया

गणितीय विज्ञान (Mathematical sciences) श्रेणी

  • डॉ. अनिश घोष

  • डॉ. साकेत सौरभ

वैद्यकीय विज्ञान (Medical sciences) श्रेणी

  • डॉ. जीमन पन्नीयम्माकल

  • डॉ. रोहित श्रीवास्तव

भौतिक विज्ञान (Physical sciences) श्रेणी

  • डॉ. कनक साहा