• मुंबईच्या २३ वर्षीय ऐश्वर्या श्रीधर यांनी २०२० सालचा 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार (Wildlife Photographer of the Year award)' जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे.

ठळक मुद्दे

  • लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये (Natural History Museum in London) सदर पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

  • हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत.

  • सदर पुरस्काराचे हे ५६ वे वर्ष आहे.

  • ‘Lights of passion’ नावाची त्यांची प्रतिमा जगभरातील स्पर्धकांमधून विजेती ठरली आहे.

  • अंतिम टप्प्यात निवड करण्यात आलेल्या केवळ १०० प्रतिमांमधून त्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

  • प्रौढ वयोगट प्रकारात भारताकडून हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या सर्वात तरुण वयाच्या महिला ठरल्या आहेत.