• जलशक्ती मंत्रालयामार्फत जल संधारण आणि व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 'वॉटर हीरोज - तुमच्या कथा सामायिक करा' (Water Heroes – Share Your Stories)' ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जलसंधारण ही जन चळवळ बनविणे आणि देशातील पाण्याविषयीची जागरूकता अधिक बळकट करणे हे जलशक्ती मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

  • सदर स्पर्धा लोकांना प्रोत्साहित करते आणि देशभरातून जलसंधारणाच्या सर्वोत्तम पद्धती एकत्रित करण्याचे काम करते.

जलशक्ती मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २०१९ साली जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाली होती.

  • केंद्रीय मंत्री: गजेंद्रसिंग शेखावत सध्या केंद्रीय मंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यमंत्री: रतनलाल कटारिया हे सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.