-
इतिहासकार रोमिला थापर लिखित 'व्हॉईसेस ऑफ डिसेंट (Voices of Dissent)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन पेंग्विन रँडम हाऊस इंडिया आणि सीगल बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
ऑक्टोबर २०२० मध्ये सदर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
नागरिकत्व कायदा (citizenship law) आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens) विरोधात नुकत्याच झालेल्या निषेधावर लक्ष केंद्रित करून बनवण्यात आलेले हे पुस्तक एक ऐतिहासिक निबंध आहे.
रोमिला थापर यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
रोमिला थापर या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी आहेत.
-
त्यांच्या उल्लेखनीय कार्यांमध्ये 'ए हिस्ट्री ऑफ इंडिया' (१९६६), 'इंटरप्रीटिंग अर्ली इंडिया' (१९९२), 'अर्ली इंडिया: द ओरिजिन टू एडी' १३०० (२००३) या पुस्तकांचा समावेश आहे.
-
डिसेंबर २००८ मध्ये त्यांना क्लूज पुरस्कार (Kluge Prize) मिळाला होता.
-
२००५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मात्र कोणताही 'राज्य पुरस्कार' न स्विकारण्याचा संकल्प करून त्यांनी त्यास नकार दिला होता.