-
महाराष्ट्रातील माजी कॅबिनेट मंत्री आणि ७ वेळा कॉंग्रेस आमदार म्हणून निवडून आलेल्या विलास पाटील उंडाळकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९८० ते २०१४ या कालावधीमध्ये ते सलग ३५ वर्षे कराड-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ७ वेळा निवडून आले होते.
-
श्री. उंडाळकर हे कॉंग्रेसचे अनुभवी नेते 'काका' म्हणून प्रख्यात होते.
-
उंडाळकर यांनी आधीच्या कॉंग्रेसप्रणित राज्य सरकारांच्या मंत्रिमंडळात सहकार तसेच कायदा व न्याय विभागांचा कार्यभार सांभाळला होता.