-
'वातायन जीवनगौरव पुरस्काराने (Vatayan Lifetime Achievement Award)' केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
लेखन, काव्य आणि इतर साहित्यिक कार्यांसाठी सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
-
डॉ. पोखरियाल यांनी विविध विषयांवर ७५ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले असून त्यांची अनेक राष्ट्रीय व परदेशी भाषांमध्ये भाषांतरेही करण्यात आली आहेत.
पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती
-
लंडनमधील वातायन-यूके संस्थेमार्फत (Vatayan-UK organization) सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा कवी, लेखक आणि कलाकारांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल सन्मान करण्याच्या उद्देशाने देण्यात येतो.