-
उत्तराखंड वनविभागामार्फत भारतातील पहिले ‘शैवाल उद्यान (Moss Garden)’ नैनीताल जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
कुमाऊंमधील नैनीताल जिल्ह्यात १० हेक्टर क्षेत्रावर पसरलेली ही देशातील अशा स्वरूपाची पहिली बाग लोकांना समर्पित करण्यात आली आहे.
-
बांधणी करण्यास जवळपास १ वर्षाचा कालावधी लागलेल्या या शैवाल उद्यानाचे उद्घाटन 'वॉटर मॅन ऑफ इंडिया (Water Man of India)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राजेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.