• उत्तराखंड राज्यामधील टिहरी-गढवाल जिल्ह्यात भारतातील सर्वात लांब गतीशील एकल-मार्ग पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या हस्ते ९ नोव्हेंबर २०२० रोजी राज्याच्या २० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सदर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

  • सदर पूल हा ७२५ मीटर लांबीचा आहे.

  • तेहरी ते प्रतापनगर दरम्यानच्या प्रवासाची वेळ याद्वारे १.५ तासांपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा आहे.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.