-
जिनेव्हास्थित व्यापार आणि विकास या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमार्फत (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) २०२० चा संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार (United Nations Investment Promotion Award) भारताची राष्ट्रीय गुंतवणूक संवर्धन संस्था इन्व्हेस्ट इंडियाला (Invest India) देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
१८० जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीजच्या (Investment Promotion Agencies - IPAs) यादीमधून इन्व्हेस्ट इंडियाला विजेता घोषित करण्यात आले आहे.
-
कोविड - १९ साथीच्या रोगाला IPAs चा असणारा प्रतिसाद हा २०२० च्या संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार मूल्यमापनासाठी आधार मानण्यात आला होता.
'इन्व्हेस्ट इंडिया' बाबत महत्वपूर्ण माहिती
-
संस्थेचे वैशिष्ट्य: सदर संस्था ही उद्योग आणि अंतर्गत व्यापार मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारा ना नफा स्वरूपाचा उपक्रम आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: दीपक बागला हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २००९ साली सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे सदर संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.