-
उत्तर प्रदेश सरकारमार्फत राज्यातील सर्व प्रकारची धारण जमीन ओळखण्यासाठी एक अद्वितीय १६-अंकी युनिकोड जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
जमीन वादाची प्रकरणे तपासणे, वादग्रस्त जमिनीच्या बनावट नोंदणी रद्द करणे तसेच लोकांना फसगत होण्यापासून वाचविणे हा सदर योजनेचा मुख्य हेतू आहे.
-
या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक भूभागाची स्वतःची वेगळी ओळख असेल.
उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.