-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांच्यामार्फत ‘यू-राइज (U-Rise)’ नावाच्या एकात्मिक पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy - NEP) २०२०' च्या अंमलबजावणीसह अशा एकात्मिक पोर्टलचे अनावरण करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.
-
सदर पोर्टलद्वारे राज्यातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर समुपदेशन आणि रोजगार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.