-
उत्तर प्रदेश राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत (PM Atmanirbhar Nidhi Scheme - SVANidhi) सर्वाधिक कर्ज मंजूर करून नुकताच प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ठळक मुद्दे
-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जवळपास ३ लाख लाभार्थ्यांना कर्ज वाटप करतील अशी अपेक्षा आहे.
-
उत्तर प्रदेश सरकार कर्जाबाबतचे अर्ज, मंजूरी आणि वितरणासह अन्य सर्व विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान झाले आहे.
-
सदर योजनेंतर्गत जवळपास २.३ लाख लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे.
-
उत्तर प्रदेशमधील ७ शहरांना देशातील पहिल्या १० शहरांच्या यादीत स्थान प्राप्त झाले आहे.
स्वनिधी (SVANidhi) योजनेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
योजनेची सुरुवात: केंद्र सरकारमार्फत १ जून २०२० रोजी सदर योजना सुरू करण्यात आली आहे.
-
योजनेचा मुख्य उद्देश: कोविड-१९ मुळे प्रभावित झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे उपजीविकेचे काम पुन्हा सुरू करण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.