-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या ट्रायफेडच्या (TRIFED) 'ट्रायफूड (Trifood) प्रकल्पाचे' तृतीयक प्रक्रिया केंद्र केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्रातील रायगड येथे आणि छत्तीसगडमधील जगदलपूर येथे ट्रायफूड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
-
सदर प्रकल्पाद्वारे आदिवासींच्या उद्योजकतेला चालना मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
-
अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या (Ministry of Food Processing - MoFPI) सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालय, TRIFED तर्फे 'ट्रायफूड (Trifood) प्रकल्प' राबविला जात आहे.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
केंद्रीय मंत्री: अर्जुन मुंडा हे सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यमंत्री: रेणुकासिंग सरुता सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९९९ साली केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.