• केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री. अर्जुन मुंडा यांच्यामार्फत 'आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे (Tribal Entrepreneurship Development Programme)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • आदिवासी व्यवहार मंत्रालय (Ministry of Tribal Affairs) आणि असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (Associated Chambers of Commerce and Industry of India - ASSOCHAM) या शीर्ष उद्योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ३ वर्षांचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  • सदर उपक्रमामुळे आदिवासी जमातींचा विकास होईल आणि त्यांची सामाजिक, आर्थिक क्षमता वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • केंद्रीय मंत्री: अर्जुन मुंडा हे सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यमंत्री: रेणुकासिंग सरुता सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.