• 'माहिती व तंत्रज्ञान सक्षम शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून आदिवासींचे सबलीकरण (Empowerment of Tribals through IT enabled Scholarship Schemes)' करण्याच्या कार्याबद्दल आदिवासी व्यवहार मंत्रालयाला (Ministry of Tribal Affairs - MoTA) स्कोच गोल्ड (SKOCH Gold) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्काराने उत्तम कार्यप्रणालीसह मंत्रालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ठळक वैशिष्ट्ये

  • डिजीटल इंडियाची स्वप्ने साकार करून पारदर्शकता आणण्यासाठी तसेच सेवांमध्ये सुलभता निर्माण करणे यांबाबत भारत सरकारची वचनबद्धता दर्शविण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे

  • २०२० सालची ही स्पर्धा स्कोच गोल्ड पुरस्कारांची ६६ वी आवृत्ती आहे

  • 'डिजीटल शासनाच्या माध्यमातून भारताचा कोविडला प्रतिसाद (INDIA RESPONDS TO COVID THROUGH DIGITAL GOVERNANCE)' असे या स्पर्धेचे नामकरण करण्यात आले आहे

  • आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 'डिजीटल इंडिया आणि ई-सरकार -२०२० स्पर्धेत' (DIGITAL INDIA & E-GOVERNANCE-2020) भाग घेतला

आदिवासी कार्य मंत्रालयाविषयी महत्वाची माहिती

  • मुख्यालय: नवी दिल्ली येथे आदिवासी कार्य मंत्रालयाचे मुख्यालय आहे

  • स्थापना: १९९९ साली या मंत्रालयाची स्थापना झाली होती

  • केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री: अर्जुन मुंडा हे विद्यमान केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत

  • राज्यमंत्री: रेणुकासिंग सरुता या विद्यमान राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत

  • कार्यभार: आदिवासी समुदायांविषयीच्या सर्व कार्यांचा भार या मंत्रालयावर आहे

  • कार्ये:

    • आदिवासी समुदायाच्या कल्याणकारी-योजना, धोरणे आखणे तसेच संशोधन व प्रशिक्षण देणे

    • STs ना शिष्यवृत्ती देण्यासह आदिवासी विकास साधणे व ऐच्छिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे