• TRACE लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स (Bribery Risk Matrix) २०२० मध्ये भारत ७७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० च्या लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करणार्‍या जागतिक यादीमध्ये भारताने ४५ गुण मिळवले आहेत.

  • २०१९ मध्ये भारत ७८ व्या स्थानावर होता. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि चीनसारख्या शेजारी राष्ट्रांपेक्षा ही चांगली कामगिरी होती.

  • भूतानने भारतापेक्षा चांगली कामगिरी करत सदर यादीत ४८ वे स्थान मिळवले आहे.

  • व्यावसायिक लाच घेण्याचा सर्वाधिक धोका उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, वेनेझुएला आणि एरिट्रियामध्ये आहे.

  • डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंडमध्ये लाचखोरीचा धोका सर्वांत कमी दर्शविण्यात आला आहे.