-
पर्यटन मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या भारतीय पर्यटन सांख्यिकी (Indian Tourism Statistics - ITS) २०२० नुसार २०१९ मध्ये सर्वाधिक देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
जवळपास ६.५३ कोटी देशी पर्यटकांनी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशला भेट दिली होती ज्याची टक्केवारी एकूण प्रवाशांच्या २३.१% इतकी आहे.
-
तमिळनाडू २१.३% सह दुसर्या क्रमांकावर असून आंध्र प्रदेश १०.२% सह तिसऱ्या स्थानावर आहे.
-
परदेशी पर्यटकांच्या बाबतीत २०१९ सालामध्ये तमिळनाडूला जवळपास ६८ लाख लोकांनी भेट देऊन पहिला क्रमांक प्रदान करून दिला आहे.
-
सदर यादीमध्ये महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेशने तिसरे स्थान मिळविले आहे.
-
२०१९ मध्ये या यादीत गोवा अंतिम स्थानावर होता.