• गुजरात राज्य सरकारमार्फत नुकतीच जगातील सर्वात मोठा झिंक स्मेल्टर प्रकल्प (Zinc Smelter Project) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यात ग्रीनफील्ड झिंक स्मेल्टरची स्थापना करण्यासाठी गुजरात सरकारमार्फत वेदांत समूहाच्या हिंदुस्तान झिंक लिमिटेड सोबत (Hindustan Zinc Ltd - HZL) करार करण्यात आला आहे.

  • सदर सुविधेमध्ये जवळपास १०००० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.