-
केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत लक्ष्मी विलास बँकेचे (Lakshmi Vilas Bank - LVB) DBS बँक इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) सिंगापूरच्या DBS बँकेच्या भारतीय शाखेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
-
या वर्षी बचावाची गरज असलेली लक्ष्मीविलास बँक ही दुसरी बँक ठरली आहे.
-
संघर्ष करणार्या देशांतर्गत बँकेला जामीन देण्यासाठी भारताने परकीय घटकाकडे वळण्याची ही पहिलीच घटना आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.