-
अन्न व कृषी संघटनेच्या (Food and Agriculture Organisation - FAO) ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ रुपयांच्या स्मृतीनाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्र शासनामार्फत कृषी आणि पोषण आहारास देण्यात आलेली ही महत्वपूर्ण प्राधान्यता आहे.
-
भूक आणि कुपोषण यांच्या समूळ उच्चाटनासाठीच्या संकल्पाचा पुरावा म्हणजेच प्रदान करण्यात आलेली ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
-
२०१६ हे 'आंतरराष्ट्रीय डाळींचे वर्ष (International Year of Pulses)' व २०२३ हे 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष (International Year of Millets)' म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावांना FAO मार्फत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
FAO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली संस्थेची स्थान करण्यात आली होती.
-
संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.