• फास्टॅगची (FASTag) डिजीटल नोंदणी जारी करण्यासाठी गुगल पे (Google Pay) सोबत सहकार्य करीत असल्याचे ICICI बँकेमार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • फास्टॅग (FASTag) जारी करण्यासाठी गुगल पे सोबत सहकार्य करणारी ICICI ही पहिली बँक बनली आहे.

  • या सुविधेमुळे ग्राहक गूगल पे अ‍ॅपद्वारे ICICI बँक फास्टॅग (FASTag) ऑर्डर, ट्रॅकिंग आणि रिचार्ज करण्यास सक्षम होतील अशी अपेक्षा आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.