-
अमेरिकेच्या नूतन अध्यक्ष पदावर निवड झालेले जो बायडन आणि उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या कमला हॅरिस हे संयुक्तपणे 'टाईम मासिकाचे पर्सन ऑफ द इयर २०२०' (Time magazine’s २०२० Person of the Year)' बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
टाईम मासिकामार्फत १९२७ पासून वार्तांकनावर परिणाम करणार्या किंवा देश अथवा जगाला सर्वात चांगले किंवा वाईट म्हणून प्रभावित करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा संघटनेला पुरस्कृत करण्यासाठी सदर वार्षिक यादी प्रसिद्ध करण्यात येते.
-
सदर पुरस्कारांव्यतिरिक्त टाईम मासिकाने कोरियन पॉप ग्रुप बीटीएस (BTS) ला 'एन्टरटेनर ऑफ दी इयर (Entertainer of the Year)' आणि बास्केटबॉल स्टार लेब्रोन जेम्सला 'अॅथलीट ऑफ दी इयर (Athlete of the Year)' म्हणून सन्मानित केले आहे.
-
झूमचे संस्थापक एरिक युआन यांना 'बिझनेस पर्सन ऑफ दी इयर (Businessperson Of The Year)' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.