• महात्मा गांधींना मरणोत्तर प्रतिष्ठीत 'अमेरिकन कॉंग्रेसनल सुवर्णपदक (US Congressional Gold Medal)' प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • शांतता तसेच अहिंसेला प्रोत्साहन देऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात सदर ठराव पुन्हा सादर करण्यात आला आहे.

  • 'कॉंग्रेसनल गोल्ड मेडल' हा अमेरिकेत प्रदान करण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

  • गांधीजी हे सदर सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय ठरतील.

इतर माजी अमेरिकन कॉंग्रेसनल सुवर्णपदक विजेते

  • जॉर्ज वॉशिंग्टन

  • नेल्सन मंडेला

  • मार्टिन ल्यूथर किंग जूनियर

  • मदर तेरेसा

  • रोझा पार्क्स