-
भाजीपाल्याचे किमान मूल्य (Floor Price) निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
ठळक मुद्दे
-
भाजीपाल्याचे किमान मूल्य भाजीपाल्याच्या उत्पादन खर्चापेक्षा २० टक्के जास्त असेल अशी सुविधा यामध्ये करण्यात आली आहे.
-
देशात प्रथमच राज्यात उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यांसाठी किमान मूल्य निश्चित केले जात आहे.
-
सदर निर्णय हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत हितावह स्वरूपाचा आहे.
केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्याचा दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.
-
राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.