-
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत 'स्वास्थ्य (Swasthya)' नामक आदिवासी आरोग्य व पोषण पोर्टल आणि 'आलेख (ALEKH)' नामक आरोग्य व पोषण विषयक ई-वृत्तपत्र सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयाकडून राष्ट्रीय ओव्हरसीज पोर्टल आणि राष्ट्रीय आदिवासी फेलोशिप पोर्टल सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
आदिवासींचे आरोग्य आणि पोषण विषयक ई-पोर्टल ‘स्वास्थ्य (Swasthya)’ नावाच्या व्यासपीठावर एकाच ठिकाणी भारतातील आदिवासींच्या आरोग्य आणि पोषण संबंधीची माहिती प्रदर्शित करण्यात येईल.
-
आदिवासी कामकाज मंत्रालयाने आरोग्य व पोषण आहारासाठी 'पीरामल स्वास्थ्य (Piramal Swasthya)' ला उत्कृष्ट माहिती व ज्ञान केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
-
'आलेख (ALEKH)' हे आरोग्य आणि पोषण विषयक त्रैमासिक स्वरूपातील ई-वृत्तपत्र आहे.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
केंद्रीय मंत्री: अर्जुन मुंडा हे सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यमंत्री: रेणुकासिंग सरुता सध्या केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९९९ साली केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.