-
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते 'स्वच्छ भारत मिशन अॅकॅडमी' सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या ‘गंदगीमुक्त भारत’ या आठवडाभराच्या वर्तन बदल मोहिमेदरम्यान 'स्वच्छ भारत मिशन अॅकॅडमी'ची सुरूवात झाली.
ठळक मुद्दे
-
'स्वच्छ भारत मिशन अॅकॅडमी'ची सुरूवात हा स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्प्यातील महत्वाचा भाग आहे.
-
सदर बाब ही वागणुकीत बदल सुनिश्चित करेल आणि PRI सदस्य, समुदाय-आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट इत्यादी प्रमुख भागधारकांच्या क्षमता वाढीस प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा आहे.
-
'स्वच्छ भारत मिशन अॅकॅडमी' ही फोन-आधारित अॅकॅडमी असून ती ६० मिनिटांचे मॉड्यूल ऑफर करते, जे IVR आधारित प्रशिक्षण कोर्स आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मंत्रालय निर्मिती वर्ष: मे २०१९ मध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाली होती.
-
केंद्रीय जलशक्ती मंत्री: श्री .गजेंद्रसिंग शेखावत हे सध्या केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यमंत्री: रतनलाल कटारिया हे सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.