-
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. गजेंद्रसिंग शेखावत आणि जलशक्ती राज्यमंत्री श्री. रतन लाल कटारिया यांच्यामार्फत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्ये / केंद्रशासित प्रदेश, जिल्हा, गट यांना विविध श्रेणींमध्ये 'स्वच्छ भारत पुरस्कार २०२०' व्हर्च्युअली जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
'स्वच्छ भारत मिशन (Swachchha Bharat Mission - SBM)' च्या अनावरणाला ६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे (२०१४ साली अनावरण) २ ऑक्टोबर रोजी जलशक्ती मंत्रालयामार्फत 'स्वच्छ भारत दिन २०२०' साजरा करण्यात आला आहे.
श्रेणीनुसार पुरस्कारांची यादी
स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय (Swachh Sundar Samudayik Shauchalaya - SSSS) अभियान
-
सर्वोत्कृष्ट राज्य: गुजरात
-
सर्वोत्कृष्ट जिल्हा: तिरुनेलवेली, तमिळनाडू
-
सर्वोत्कृष्ट गट: खचरोड, उज्जैन (मध्य प्रदेश)
-
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत: चिन्नौर (सालेम)
सामुदायिक शौचालय अभियान (Samudayik Shauchalaya Abhiyan - SSA)
-
सर्वोत्कृष्ट राज्य: उत्तर प्रदेश (गरीब कल्याण रोजगार अभियान अंतर्गत) आणि गुजरात (गैर-गरीब कल्याण रोजगार अभियान अंतर्गत)
-
सर्वोत्कृष्ट जिल्हा: प्रयागराज (गरीब कल्याण रोजगार अभियान अंतर्गत) आणि बरेली (गैर-गरीब कल्याण रोजगार अभियान अंतर्गत)
-
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत: बोरिगाव, बोंगाईगाव (आसाम)
गंदगी से मुक्त (Gandagi Se Mukt - GMB) अभियान
-
सर्वोत्कृष्ट राज्य: तेलंगणा आणि हरियाणा
-
सर्वोत्कृष्ट जिल्हा: मोगा, पंजाब