• ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'ओडीशा राज्य शिष्यवृत्ती पोर्टल (Odisha State Scholarship Portal)’ आणि ‘सुमंगल पोर्टल (Sumangal Portal)’ नावाच्या २ वेब पोर्टल्सचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास मदत करणे हे 'ओडीशा राज्य शिष्यवृत्ती पोर्टल'चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • ‘सुमंगल पोर्टल'द्वारे लोकांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळवून देण्यास मदत करण्यात येणार आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.