• इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती आणि आयटीसी लिमिटेडच्या अग्री आणि आयटी बिझनेस गटाचे प्रमुख असणारे शिवकुमार सुरमपुडी यांना ग्रामोदय बंधू मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पद्मभूषण विजय भटकर, ब्रिन्ग पोगुला गणेशम (तेलंगणातील गंगादेवीपल्लीचे माजी सरपंच), पद्मश्री एस. पी. वर्मा, विलास शिंदे (संचालक, सह्याद्री फार्म), कुसम राजामौली, श्रीजनाचे संस्थापक आणि नाबार्डचे अध्यक्ष गोविंदा राजुलू चिंतला यांचा इतर विजेत्यांमध्ये समावेश आहे.

ग्रामोदय बंधू मित्र पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • उस्मानिया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ना-नफा तत्त्वावरील संस्था, ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी (Gramodaya Chamber of Commerce and Technology - GCOT) द्वारा ग्रामोदय बंधू मित्र पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.

  • महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.