-
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत (National Bank for Agriculture and Rural Development - NABARD) आर्थिक वर्ष २०२१ साठी ८०० कोटींची विशेष पुनर्वित्त सुविधा जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सुविधेद्वारे नाबार्ड भारत सरकारच्या पाणी, स्वच्छता बाबतच्या कार्यक्रमास (Water, Sanitization and Hygiene - WASH) पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे.
NABARD बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NABARD म्हणजेच National Bank for Agriculture and Rural Development अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक होय.
-
स्थापना वर्ष: १२ जुलै १९८२ रोजी NABARD ची स्थापना झाली होती.
-
अध्यक्ष: जी आर चिंताला हे सध्या NABARD अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे NABARD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.