• बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (United Nations Development Programme - UNDP) प्रतिष्ठीत 'एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने (SDG Special Humanitarian Action Award)' सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लाखो परप्रांतीय तसेच अडकलेल्या विद्यार्थ्यांना नि:स्वार्थपणे मदतीचा हात पुढे करून त्यांच्या प्रदेशात परत पाठविल्याबद्दल सदर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

  • याव्यतिरिक्त ते कोविड-१९ साथीच्या आजारानंतर लहान मुलांना मोफत शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असून गरजूंना मोफत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य करत आहे.

  • लिओनार्डो दिकॅप्रियो, एमा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँचेट, अँजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, अँटोनियो बंडेरस, निकोल किडमन आणि प्रियंका चोप्रा यांना देखील संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे सन्मानित करण्यात आले आहे.

UNDP बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNDP म्हणजेच United Nations Development Programme अर्थात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम होय.

  • प्रमुख: अचिम स्टीनर हे सध्या UNDP च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २२ नोव्हेंबर १९६५ रोजी UNDP ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क येथे UNDP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.