• 'प्रवाह अँड कॉममुटिनी (Pravah and ComMutiny) - द युथ कलेक्टिव (Youth Collective - CYC) च्या संस्थापक सदस्य अशरफ पटेल यांना 'भारत २०२० चा सामाजिक उद्योजक पुरस्कार (Social Entrepreneur of the Year Award – India २०२०)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय महिला बाल विकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

  • भारताच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण, टिकाऊ पर्याय सुचवणाऱ्या उद्योजकांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • स्वाब फाऊंडेशन आणि जुबिलेंट भारतीय फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या वार्षिक पुरस्काराची यंदाची ११ वी आवृत्ती आहे.