• तमिळनाडू राज्य सरकारमार्फत राज्यातील सरकारी शाळांमध्ये नुकतीच 'स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना (Smart Black Board Scheme)' सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • चांगले शैक्षणिक वातावरण सुनिश्चित करणे तसेच डिजीटल इंडिया आणि आत्मानिर्भर भारत या दिशेने मार्गक्रमण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी तमिळनाडू सरकारने शैक्षणिक अभ्यासक्रम ४० टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तमिळनाडू राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: एडप्पडी के. पलनीस्वामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • राजधानी: चेन्नई ही तमिळनाडू राज्याची राजधानी आहे.

  • स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी तमिळनाडू राज्याची स्थापना झाली होती.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडू देशात १० व्या क्रमांकावर आहे.