• मेघालय राज्य सरकारमार्फत इस्रायल देशाशी भागीदारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी राज्यामध्ये उच्च मूल्यांच्या भाजीपाल्यांसाठी उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence - CoE) स्थापन करण्यासाठी इस्त्रायलबरोबर भागीदारी करण्यात आली आहे.

  • राज्यात माती, शेती-हवामान स्थिती इ. नुसार जैवविविधता आणि उपलब्ध स्त्रोतांचा वापर करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • उत्कृष्टता केंद्र हे पूर्व गारो टेकड्या जिल्ह्यातील, नोकरेक येथे लिंबूवर्गीय भाज्या, फळे आणि वनस्पतींचा संशोधन कार्य आणि पर्यटन क्षमतेसह विस्तार करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.