• केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (Union Minister of Science and Technology) डॉ. हर्ष वर्धन यांनी महिला वैज्ञानिकांना सहाय्य करण्याच्या उद्देशासाठी नुकतेच 'SERB - POWER' योजनांचे अनावरण केले आहे.

ठळक मुद्दे

  • उदयोन्मुख महिला वैज्ञानिकांना प्रोत्साहित करून पाठिंबा देणे आणि महिला संशोधकांनी विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या सीमांत भागात संशोधन व विकास उपक्रम राबविणे ही सदर योजनांची मुख्य उद्दिष्टे आहेत.

  • SERB - POWER म्हणजेच विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ - शोध संशोधनात महिलांच्या संधींचा प्रचार (SERB - POWER - Science and Engineering Research Board - Promoting Opportunities For Women in Exploratory Research) होय.

  • भारतीय शैक्षणिक संस्था, संशोधन व विकास प्रयोगशाळांमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातील लिंग - असमानता कमी करणे, संशोधन आणि विकास कार्यातील भारतीय महिला शास्त्रज्ञांना समान प्रवेश आणि संधी सुनिश्चित करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर योजना तयार करण्यात आली आहे.

SERB बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SERB म्हणजेच Science and Engineering Research Board अर्थात विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ होय.

  • संस्थेची विशेषता: SERB ही केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे.

  • संस्थेची स्थापना: २००९ साली भारतीय संसद कायद्याद्वारे SERB ची स्थापना करण्यात आली होती. (SERB कायदा, २००८)