• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ प्रसारण कार्यक्रमादरम्यान सप्टेंबर २०२० हा महिना 'पोषण माह' किंवा 'पोषण महिना' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्दे

  • मुलांमध्ये पोषण विषयक जागरूकता वाढविण्यासाठी शाळांनी पोषण मॉनिटर आणि न्यूट्रिशन कार्ड सादर करणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

  • MyGov पोर्टलमार्फत पोषण महिन्यादरम्यान अन्न आणि पोषणविषयक प्रश्नमंजुषा (Food and Nutrition Quiz) आणि मेम स्पर्धा आयोजित करण्यात येईल.

  • इष्टतम पौष्टिकतेचे महत्त्व सर्वांना समजावण्यासाठी सप्टेंबर महिना संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येईल.

  • यापूर्वी सप्टेंबर २०१८ आणि २०१९ मध्ये पोषण महिना साजरा करण्यात आला होता.