-
ज्येष्ठ अणू वैज्ञानिक आणि अणू ऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission - AEC) माजी अध्यक्ष श्री. शेखर बसू यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
शेखर बसू यांनी भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागाचे (Department of Atomic Energy - DAE) सचिव आणि भाभा अणू संशोधन केंद्राचे (Bhabha Atomic Research Centre - BARC) संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
-
बिहारच्या मुझफ्फरपूर येथे २० सप्टेंबर १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
शेखर बसू यांची विशेष कामगिरी
-
भारताची पहिली अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी अर्थात आयएनएस अरिहंतसाठी त्यांनी अत्यंत जटील स्वरूपाची अणुभट्टी विकसित केली होती.
-
तमिळनाडूमधील भारतीय न्यूट्रिनो वेधशाळेच्या विकासातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पुरस्कार आणि सन्मान
-
२०१४ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
-
शेखर बसू यांना इंडियन न्यूक्लियर सोसायटी अवॉर्ड (Indian Nuclear Society Award - २००२), डीएई ग्रुप अॅचिव्हमेंट अवॉर्ड (DAE Group Achievement Award - २००६) आणि डीएई स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड (DAE Special Achievement Award - २००७) यासारखे अनेक पुरस्कार मिळाले होते.