-
केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांच्यामार्फत सागरी क्षेत्राच्या वादविवादांचे निराकरण वेळेवर करण्यासाठी सरोद-पोर्ट्स (Society for Affordable Redressal of Disputes-Ports - SAROD-Ports) नावाच्या विवाद निराकरण यंत्रणेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सरोद-पोर्ट्स समुद्री क्षेत्रातील लवादाच्या माध्यमातून वाद मिटविण्यास सल्ला देईल व मदत करेल अशी अपेक्षा आहे.
-
खाजगी बंदरांसह मेजर पोर्ट ट्रस्ट्स, बिगर-प्रमुख बंदरांमधील बंदरे व वहन क्षेत्र यांचादेखल यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
-
NHAI मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सरोद-रोडच्या (SAROD-Road) स्वरूपात ही यंत्रणा महामार्गाच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या तरतूदींसारखी आहे.
-
किफायतशीर पद्धतीने वाद मिटविण्यासाठी व वेळेत सोडविण्यासाठी संस्था नोंदणी कायदा, १८६० अन्वये हे स्थापन करण्यात आले आहे.