• प्रख्यात ओडीया कवी श्री. नित्यानंद नायक यांना त्यांच्या २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेतेबेलाकु नाथिबा (Setebelaku Nathiba)’ या कविता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रतिष्ठीत स्वरूपाचा 'सरला पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • ५ लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • संगीत व कला क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानाबद्दल अनुक्रमे रणजितकुमार नाग आणि श्यामसुंदर पट्टनाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

  • नाग यांना इला पांडा संगीत सन्मान तर पट्टनाईक यांना इला पांडा चित्रकला सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

सरला पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • ओडीशा राज्याचा साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य स्वरूपाचा पुरस्कार म्हणून 'सरला पुरस्कार' ओळखला जातो.

  • ओडीशामधील प्रख्यात उद्योजक बन्सीधर पांडा आणि इला पांडा यांनी १९७९ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.