-
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत हरित व स्वच्छ ऊर्जेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘सक्षम (SAKSHAM)’ नावाच्या जनजागृती अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेच्या (Petroleum Conservation Research Association - PCRA) वतीने सदर अभियान आयोजित करण्यात आले आहे.
-
ग्राहकांनी स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रवृत्त होऊन हुशारीने जीवाश्म इंधन वापरण्यासाठी वर्तनात्मक बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.