• उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते नुकताच 'सेफ सिटी प्रोजेक्ट (Safe City Project)' सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये राबविण्यात येणारे हे महिला सुरक्षा अभियान आहे.

  • सदर प्रकल्प ही १८० दिवस कालावधीसाठी चालणारी मोहीम आहे ज्याअंतर्गत पोलिस व अन्य विभागांमार्फत सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेस बळकटी निर्माण करण्यासाठी कार्य करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

  • सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी एक सुरक्षित आणि सक्षम वातावरणाची निर्मिती करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • सदर प्रकल्पाला 'निर्भया फंड'तून वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.