-
प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
बालसुब्रमण्यम यांनी १९६६ मध्ये श्री श्री श्री मर्यादा रामण्णा या तेलगू चित्रपटातून आपल्या गायन करियरची सुरुवात केली होती.
-
हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम यांसह १६ भाषांमध्ये त्यांनी जवळपास ४०००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
कारकीर्दीत मिळालेले पुरस्कार
-
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना त्यांच्या कारकीर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार 'संकरभरणम'साठी मिळाला होता.
-
दुसर्या वेळी त्यांना त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यासाठी अर्थात 'एक दुजे के लिए' या चित्रपटातील 'तेरे मेरे बीच में' गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.