-
ओडिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावर DRDO मार्फत नव्या पिढीतील 'रुद्रम (Rudram)' या अँटी-रेडिएशन (Anti-Radiation) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
रुद्रम हे क्षेपणास्त्र एसयू-३० एमके १ (SU-30 Mk1) लढाऊ विमानातून प्रक्षेपित करण्यात आले आहे.
-
मॅक २ इतका वेग (ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेग) असणारे हे क्षेपणास्त्र २५० किमी इतक्या अंतरातील सुरक्षा काटेकोरपणे बजावण्यास अत्यंत सक्षम स्वरूपाचे आहे.
-
संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) भारतीय वायुसेनेसाठी (Indian Air Force - IAF) विकसित करण्यात आलेले रुद्रम हे देशातील पहिले स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्र ठरले आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.