• २०२१ सालच्या 'रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Rotterdam International Film Festival)' ५० व्या आवृत्तीत तमिळ चित्रपट 'कूझंगल (Koozhangal)' ने 'टायगर पुरस्कार (Tiger Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात आलेला टायगर पुरस्कार हा या महोत्सवातील सर्वोच्च सन्मान आहे.

  • कूझंगल (म्हणजे गोट्या) नयनतारा निर्मित तसेच विनोदराज पी. एस. दिग्दर्शित आहे.

  • सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा हा दुसरा भारतीय चित्रपट तर पहिला तमिळ चित्रपट आहे.

  • पुरस्कार प्राप्त पहिला भारतीय चित्रपट मल्याळम दिग्दर्शक शशीधरन दिग्दर्शित 'दुर्गा (Durga)' होता.